नागलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जमादार नाना शिंदे यांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नाना शिंदे यांची नागलगाव बिट जमादार म्हणून पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी नियुक्ती केली आहे.28 फेब्रुवारी नागलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बिट जमादार नाना शिंदे व होमगार्ड काकडे यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच सुभाष राठोड,पोलीस पाटील अंकुश वाघे,बाळू राठोड,ग्रामपंचायत सदस्य राजू गुंडरे,शिवा चवळे,भागवत शेरे,ग्रामपंचायतीचे लिपिक रमा शेरे, बाळू गुरमे,संगमू शेरे,सदाशिव शेरे,राम राठोड,अंकोश राठोड,ग्रामपंचायतीचे सेवक सोपान बुडगे आदी उपस्थित होते.
