लोकगीतातून सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोहचतायत गावोगावी

लोकगीतातून सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोहचतायत गावोगावी

लातूर (एल.पी.उगीले) : ओ… मामा, ओ काका, ये मावशी तुम्हाला माहिती आहे का? भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना. शाहीर पाहडी आवाजात गाव एकत्र करतो. अन पोवडा, गीतं, सवाल जबाबतून सामान्यातल्या सामान्य माणसाला सामाजिक न्याय विभागाच्या योजना सर्व सामान्यापर्यंत पोहचवतो, उत्स्फूर्त टाळ्याही वाजतात.सोमवारी रात्री पानगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये जिल्ह्यातील कलापथकाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याचे हे चित्र होतं,कार्यक्रमाला उपस्थिती होती विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे आणि जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत कलापथकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. अनुसूचित जाती उपयोजना 2022-23 अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील बारा कलापथक व पथनाट्य संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील 180 गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेचे सोमवारी पानगाव येथे उद्घाटन झाले. परिवर्तन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या धम्मपाल सावंत यांच्या चमूने याठिकाणी कलापथकाच्या कार्यक्रमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!