सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता.अहमदपूर येथे दि. २७/०२/२०२३ रोजी मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संचालक कुलदीप हाके तसेच व्यासपीठावर संचालिका सौ. शिवालिका कुलदीप हाके,प्राचार्य रूथ चक्रनारायण उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी मराठी वेशभूषा परिधान करून नृत्य सादर केले तसेच काही विद्यार्थांनी मराठी राजभाषा या विषयावर व जेष्ठ मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनावरती भाषण केले. यावेळी कुलदीप हाके यांनी मराठी राजभाषा वरती विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सौ. शिवालिकाताई हाके यांनी “लाभले हे भाग्य आम्हास बोलतो मराठी” हे गीत सादर केले. या कार्यक्रमाचे प्रात्साविक व संचालन ऋतिक पोले यांनी केले तर संभाजी सांगळे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शेख मोसिन,हीना कल्लुरकर,ज्योत्सना स्वामी, स्नेहा ओझा,अंजली बोधनकर, आयुषी पोले व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
