अहमदपूर इच्छापूर्ती हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा शोभा यात्रेने अहमदपूर शहर दुमदुमले

अहमदपूर इच्छापूर्ती हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा शोभा यात्रेने अहमदपूर शहर दुमदुमले

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील न्यू शॉपिंग सेंटर च्या इच्छापूर्ती हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व भव्य शोभायात्रा महात्मा गांधी महाविद्यालयाच्या समोरून कलशधारी महिला, वारकरी संप्रदाय, चिमुकले वारकरी, लेझीम पथक, बँड पथक, वारकरी संप्रदायातील सदभक्त, न्यू शॉपिंग सेंटर मधील गणवेश धारी सदभक्त आणि महिला भगिनींच्या उपस्थितीत शोभायात्रा भगवे झेंडे ,बँड पथका सह काढण्यात आली.

प्रारंभी हनुमान मूर्तीची आणि महादेव मूर्तीची महाराजांच्या उपस्थितीमध्ये विधिवत व मंत्र उपचाराच्या गजर आणि पूजन करण्यात आले. फुलाने सजवलेल्या रथामध्ये इच्छापूर्ती हनुमान मूर्तीची शोभायात्रा महात्मा गांधी महाविद्यालयाच्या समोरून वाजत गाजत महात्मा बसवेश्वर चौकातून शिवाजी चौक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक- आझाद हिंद चौक- ग्रामदैवत हनुमान मंदिराला वळसा घालून हिना लॉज- पोलीस स्टेशन- स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा -बस स्थानक – थोडगा रोड – लक्ष्मी चित्रमंदिराला वळसा घालून न्यू शॉपिंग सेंटर मधून इच्छापूर्ती हनुमान मंदिरात शोभायात्रा अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आली.

या भव्यदिव्य शोभायात्रेत जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, किसान मोर्चाचे सरचिटणीस दिलीपराव देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, डॉक्टर ऋषिकेश पाटील, आडत व्यापारी बाबुराव शेटकार, माजी नगरसेवक अभय मिरकले, माजी नगरसेवक बालाजी आगलावे पाटील, माजी नगरसेवक रविशंकर महाजन, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमभाऊ पुणे, अँड स्वप्निल व्हत्ते, डॉक्टर अम्रत चिवडे, प्रा. रामदास काटापले, आढत व्यापारी अनिल मेनकुदळे, डॉक्टर बालाजी साळुंखे, डॉक्टर अमोल पागे, प्राचार्य दिलीप माने, एडवोकेट विजयकुमार शेळके, केदारनाथ काढवादे, विनोद हिंगणे, मुख्याध्यापिका आशा रोडगे, शंकराप्पा भालके, चिंतामणी येवंदगे, यांच्यासह भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी इच्छापूर्ती हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा समितीचे रमाकांत नागठाणे, राम तत्तापुरे, हरिभाऊ कोटलवार, संतोष रोडगे, महेश शेटकर, सूर्यकांत शेटकर, गजानन आंधळे, लक्ष्मण अलगुले, प्रीतम भुतडा, मोहन पाटील, रमेश केंद्रे, पवन मालू, सदाशिव कराळे, तुकाराम साबणे, महादेव स्वामी यांच्यासह महिला भगिनींनी आणि सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!