एक मार्च रोजी अहमदपूरात श्री इच्छापूर्ती हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील न्यू शॉपिंग सेंटर मधील नियोजित मंदिराच्या जागेमध्ये इच्छापूर्ती हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा दि. 1 मार्च रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता भक्ती स्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी महाराज आणि वसमतच्या थोरला मठ चे परमपूज्य वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्याला महाप्रसादाची व्यवस्था आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सौजन्याने करण्यात आलेली आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून कीर्तन प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
