यशवंत विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा

यशवंत विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : नोबेल पुरस्कार विजेते तथा भारतरत्न सी. व्ही. रमण यांचा जन्मदिवस अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिवस यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. प्रारंभी प्राचार्य व्ही व्ही गंम्पले यांच्या हस्ते भारतरत्न सी. व्ही. रमन आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विचारपीठा वर पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, कोटा पॅटर्न चे समन्वयक कयूम शेख, प्रमुख मार्गदर्शक सुनील धनुरे, राम तत्तापुरे, राजकुमार पाटील, हरी गिरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या समयी प्रमुख मार्गदर्शक सुनील धनुरे यांनी भारतरत्न सी. व्ही. रमण यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी राम तत्तापूरे यांचे मनोगत पर भाषण होऊन प्राचार्य व्ही. व्ही. गंपले यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन गहिनीनाथ शिरसागर यांनी आभार संतोष मालवदे यांनी मांनले. या सोहळ्याला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!