ढोरसांगवी येथील जिल्हा परिषद शाळेत स्वयंशासन दिन साजरा
उदगीर ( एल.पी. उगीले ) : जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला . अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गुरमे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आदर्श शिक्षक गंगाधर मुंडे,ज्येष्ठ शिक्षक ज्ञानोबा टेकले,सह शिक्षक दत्ता पवार व स्वर्णमाला नलाबले आदींची उपस्थिती होती.
स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणून अभिमन्यु कदम,उपमुख्याध्यापक म्हनून शाहू वाघमारे तर पर्यवेक्षक म्हणून संजिवनी पोतने यांनी काम पाहिले.तर शिक्षक म्हणून तुकाराम ढगे,पूजा वाघमारे,तुळशी डोलारे,अश्विनी पाटील ,नरेंद्र वाघमारे, अवधूत ढगे ( सेवक ) म्हणून काम पाहिले.यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना गंगाधर मुंडे म्हणाले की, प्रशासन चालवणे म्हणावे तेवढे सोपे नसते, जसे “दुरून डोंगर साजरे दिसते” त्या साठी “अनुभव हा सर्वात मोठा गुरू” आहे. ,”पाण्यातला मासा झोप घेतो कसा ,जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ” आणि हा अनुभव आज आपल्याला आज आला असेल, असेही म्हणाले. पुढे बोलतांना मुंडे म्हणाले की, मुलांनो जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर नेहमीच आई – वडील व गुरुजी चा आदर करा.कारण तुमच्या शिक्षणाचा सर्व काळ व जास्त वेळ आई – वडील आणि गुरू यांच्याच सानिध्यात जातो. म्हणून तुमच्या जीवनाला आकार देण्याचे व घडवण्याचे काम यांच्या हातून होत असते. म्हणून नेहमीच त्यांचा आदर करा.त्यांचे मार्गदर्शन घेत जावा, असे सांगितले. यावेळी स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापक व शिक्षक तशेच कांहीं विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम ढगे यांनी केले , सूत्रसंचालन संजिवनी पोटाने हिने केले तर आभार प्रदर्शन अभिमन्यू कदम यांनी मानले.
