आतनुरच्या विकासात आ. बनसोडे यांचा सिंहाचा वाटा – चंद्रशेखर पाटील

आतनुरच्या विकासात आ. बनसोडे यांचा सिंहाचा वाटा - चंद्रशेखर पाटील

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलत असतानाच, प्रत्येक गावातील विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बनसोडे यांनी अतनुर गावच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. एकंदरीत या भागाच्या विकासामध्ये आ. संजयभाऊ बनसोडे यांचा सिंहाचा वाटा आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही. असे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते चंद्रशेखर पाटील आतनुरकर यांनी व्यक्त केले.

माजी गृहराज्यमंत्री आ. संजयभाऊ बनसोडे यांनी आतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आमदार निधीतून 10 लक्ष रुपये विकास निधी, सिसी रोड साठी मंजूर करून दिले आहेत.त्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आतनूर येथील दयानंद स्वामी महाराजांच्या हस्ते पार पडले. यावेळी सरपंच चंद्रशेखर पाटील बोलत होते.

यावेळी उपसरपंच बाबुराव कापसे, माजी सैनिक इस्माईल साब मुंजेवार, माजी सैनिक अयुब साब मुंजेवार, माजी सरपंच दिलीप कोकणे, माजी जी. प. सदस्य मोमीन साहेब ग्रा. प. स. प्रमोद संगेवार, ग्रा. प. स. विठ्ठल बारसोळे, ग्रा प स राहुल गायकवाड, नामदेव गायकवाड, मारोती गुंडीले, कैलास सोमुसे, पांडुरंग जाधव, जयवंत गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, अकबर शेख, कांतू मामा गायकवाड, संग्राम घुमडे, माधव गायकवाड, गजानन सोमुसे, रंजीत कापडे, बबलु मुंजेवार, भीमा गायकवाड, किसन बनसोडे, मारुती गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना चंद्रशेखर पाटील म्हणाले की, उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासाची गंगा खेचून आणण्याचे सामर्थ्य केवळ आणि केवळ आमदार संजय बनसोडे यांच्यामध्ये आहे. हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉग पूर्णत्वाकडे जात आहे. आतनूर सारख्या छोट्याशा गावात आज विकासाची अनेक कामे होत आहेत. त्याचे सर्व श्रेय आमदार संजय बनसोडे यांनाच असल्याचेही चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले.

About The Author

error: Content is protected !!