नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून डॉ. शशिकांत महावरकर

लातूर (एल. पी. उगीले) : नांदेड परीक्षेसाठी बऱ्याच प्रतीक्षेनंतर अर्थात विशेष पोलीस महानिरीक्षक नुसार तांबोळी यांची बदली 2022 मध्ये डिसेंबर महिन्यात मुंबई येथे झाली होती, तेव्हापासून नांदेड परिक्षेत्रासाठी सतत वेगवेगळ्या अधिकाऱ्याकडे प्रभार देण्यात आला होता. सुरुवातीला औरंगाबाद परिक्षेत्रासाठी कार्यरत असलेल्या डीआयजीकडे प्रभाव देण्यात आला होता. मध्यंतरी काही काळ जय जाधव यांच्याकडेही देण्यात आला होता. मात्र कायमस्वरूपी विशेष पोलीस महानिरीक्षक रुजू न झाल्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. जसे की वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे त्या जिल्हा कार्यक्षेत्रात कार्यकाळ संपल्यानंतर देखील त्यांच्या बदल्यात कोणत्या जिल्ह्यात करायच्या? हे डिसेंबर २०२२ पासून प्रलंबित राहिलेले आहे. तसेच इतरही काही कामे कामे शिल्लक असल्याने पोलीस अधिकारी परेशान होते. कारण मध्यंतरी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना शर्मा यांच्याकडे जेव्हा पदभार होता तेव्हा, ते देखील काही काळासाठी सुट्टीवर गेल्याने पोलीस अधिकाऱ्यांचे प्रश्न तसेच पेंडिंग राहिले होते. आता नांदेड परीक्षेत्रासाठी डॉ. शशिकांत महावरकर यांची नियुक्ती झाल्याने हे प्रश्न सुटतील. तसेच या परीक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेला देखील चांगले दिवस येतील. अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून डॉ. शशिकांत महावरकर

यासोबतच महाराष्ट्राच्या गृह विभागामार्फत राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये बऱ्याच दिवसापासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या आठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये आयपीएस बिपिन कुमार सिंह यांची आर्थिक गुन्हे शाखा अप्पर पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयपीएस प्रभात कुमार यांना होमगार्डची जबाबदारी देण्यात आली आहे. बिपिन कुमार सिंह यांची नियुक्ती आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस महासंचालक पदी करण्यात आली आहे. तर राजकुमार व्हटकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके पदी नियुक्त करण्यात आली आहे. विनीत अग्रवाल यांची म्हाडाच्या अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभात कुमार यांची उपमहा समादेशक होमगार्ड पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी जय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कैसर खालीद यांची मोटार परिवहन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. डी के पाटील भुजबळ यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्याही बदला करण्यात आल्या आहेत. यामध्ये अभिजीत शिवथरे यांना कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर पौर्णिमा चौगुले यांना मीरा-भुंदर वसई विरारच्या पोलीस उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल खाडे यांची बदली जालना जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे. या पूर्वी आर्थात पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आता आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या अंतर्गत जी काही कामे प्रलंबित होती, ती कामे आता मार्गी लागतील. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author

error: Content is protected !!