अक्षरनंदन शाळेत मराठी विज्ञानदिन साजरा

अक्षरनंदन शाळेत मराठी विज्ञानदिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील अक्षरनंदन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत विज्ञानदिन आनंदात साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील विविध प्रयोगाचे सादरीकरण केले, तसेच प्रोजेक्ट ही विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होते. यामध्ये ठिंबक सिंचन, पवणचक्की, पथदिवे अशा विविध प्रोजेक्टचे सादरीकरण करण्यात आले. व विज्ञान दिन आनंदात साजरा झाला. याप्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख वर्षा खोंडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील विज्ञानाचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक शिवशंकर जीवणे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!