गजानन पाटील यांना स्वा. रा. ती. म. विद्यापीठाची डॉ. पी.एच.डी. पदवी प्रदान
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील किसान शिक्षण प्रसारक संस्थेत कार्यरत असलेले, महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अहमदपूर येथील सामाजिक शास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक तथा संशोधक शिक्षक गजानन हनमंतराव पाटील यांना “स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, अंतर्गत, मानव्य विद्याशाखेतील, भूगोल विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. गजानन पाटील यांनी “लातूर जिल्ह्यातील दाळ उद्योगधंद्याचा भौगोलिक अभ्यास” या विषयावर प्रो.डॉ.आर.एस. धणुष्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण केले. या संशोधन कार्यासाठी ,कि.शि. प्र. संस्थेचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर ,सचिव, ज्ञानदेव झोडगे ,सर्व सन्माननीय कार्यकारणी सदस्य, मुख्याध्यापक बाळा प्रसाद काबरा, पर्यवेक्षक अरुण सूर्यवंशी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच स.शि. प्र.सं.गुडसूरचे सचिव विनोबा पाटील, म.रा.सा.प.मुबई सदस्य धनंजय गुडसुरकर, प्राचार्य.डॉ. सदानंद गोणे, प्राचार्य, डॉ. के.बी. कणकुरे, प्राचार्य डॉ.माळी, उपप्राचार्य डॉ.काळगापुरे, प्रा.डॉ. मानकरी, प्रा.डॉ.कुलकर्णी, प्रा.डॉ.नागलगावे, प्रा.मोरे, प्रा.डॉ.पद्माकर गोणे, प्रा.संगम भांगे तसेच मित्रपरिवार शिवकुमार होळसंबरे, धनराज बंडे, कुमार बंडे,बलन मुडपे, बाळू तोटकर, धनाजी मानसिंगे, विष्णू जगळपुरे, मिलिंद जोशी, अनिल गुणाले, गणेश जोशी, विनोद भारती, निवृत्ती बंडे, गोपीनाथ पारसेवार व समस्त गुडसूर ग्रामस्थ मित्रपरिवार यांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.
