ज्ञान वर्धिनी गुरूकुल इंग्लीश स्कुल चे तिसरे स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न
उदगीर(एल.पी.उगीले) येथील ज्ञान वर्धिनी गुरूकुल इंग्लीश स्कुल चे तिसरे स्नेह सम्मेलन अतिशय उत्साह व हर्षोल्हासात देगलुर रोड येथील राधेकृष्ण मंगल कार्यालयात पार पडले. कार्यक्रमास उदगीर नगरीचे प्रसीद्ध युवा उद्योजक बिपीन जयवंतराव पाटील, सामाजीक कार्यकर्ते सतिष पाटील मानकीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याच बरोबर शासकिय वैद्यकिय अधिकारी डॉ. विशाल वरवट्टे व युवा नेते अंकुश ताटपल्ले यांनी सुध्दा प्रमुख उपस्थिती लावली.
2018 मध्ये उद्योजक गोपाळ राजेंद्र पाटील व युवा सामाजीक व शैक्षणिक उद्योजक प्रदीप बिरादार यांनी ज्ञान वर्धिनी गुरूकुलची स्थापना केली. पहील्या शैक्षणीक वर्षात अवघ्या 40 विद्यार्थ्यांपासुन हा ज्ञानदानाचा यज्ञ सुरु झाला. शाळेच्या संस्थापकांनी घेतलेल्या मेहनती मुळे, त्याच्यातील जीद्दीमुळे व सामाजासाठी एक उत्तम पीढी घडवण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक पध्दतीमुळे आज 140 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. जपळपास 10 खेड्यांतुन विद्यार्थी येथे येतात, या मागचे कारण म्हणजे अशा या स्पर्धेच्या काळात सुध्दा अतिशय कमी दरात उत्तम दर्जाचे शिक्षण ज्ञान वर्धिनी गुरूकुल येथे दिले जाते. अशी माहीती संस्थेचे सचिव प्रदीप बिरादार यांनी दीली. आमच्या प्रयत्नास अतिशय उत्तम असा प्रतिसाद देत सर्व पालकांनी त्यांचे प्रेम व आशीर्वाद आमच्यावर सतत ठेवले, असे संस्ठेचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी आपल्या आभार प्रर्दशमनात सांगीतले. कार्यक्रमास बहुसंख्य पालकांनी उपस्थिती लावली होती.
