हत्तीबेट येथील बंद असलेली लेणी स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील रासेयोच्या स्वयंसेवकांनी साफ सफाई केली
उदगीर (एल.पी.उगीले) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबीर मौजे देवर्जन (हत्तीबेट) येथे होत आहे.या शिबिराच्या माध्यमातून हत्तीबेट या पर्यटन स्थळाची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील मागील 15 वर्षा पासून बंद असलेली पातळ लिंग लेणी (गुफा) राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी साफ-सफाई केली. सदरील लेणी(गुंफा) ही येत्या गुरुवार पासून सर्व पर्यटकासाठी सुरू करण्यात येईल. सदरील लेणी गुंफाची साफ़ सफाई राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, प्रा. नयन भालेराव, विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी नुच्चे,शंकर पाटील, वैभव सोमवंशी, रुपेश मोरे, बालाजी कुमठे, योगीराज पांचाळ, राम पवार, राज पवार, सुरज माळेगावे यांनी सहभाग घेउन करून घेतली.
