विज्ञान, विवेक, अध्यात्म हे मानवी जीवनासाठी आवश्यक स्तंभ
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य प्रा.डॉ.विजयकुमार पाटील हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानातील मूलभूत संकल्पना विशद केल्या, तसेच विज्ञानातील संशोधन हे विवेकशील असावे.त्याचा उपयोग मानवी कल्याणासाठी व्हावा, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर हे होते, त्यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व विशद केले आणि डॉक्टर सी.व्ही.रमण यांच्या रमण इफेक्ट याच्या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.एम.बी.स्वामी यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी केलेल्या जीवशास्त्रीय मॉडेल व पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले तसेच विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांक कुमारी पद्मा मुसळे, द्वितीय अशोक शिंगे, तृतीय बंडे निकिता यांना रोख रक्कम आणि पुस्तके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.बी.डी.करंडे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.सुरेश लांडगे यांनी मानले. याप्रसंगी प्रा.डॉ.जे.एम. पटवारी, प्रा.डॉ.आर.के.नारखेडे, प्रा.डॉ.पी.एस.कांबळे, प्रा.डॉ.पी.एस.शेटे, प्रा.डॉ.एन.डी.वगशेटे, प्रा.आर.डी.जोशी, प्रा.ए.एस.भाताडे हे उपस्थित होते.
