अहमदपूरात इच्छापूर्ती हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठान व कलशारोहण रोहन उत्साहात साजरा

अहमदपूरात इच्छापूर्ती हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठान व कलशारोहण रोहन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : माणसाचा देह हा निरपेक्ष जरी असला तरी तो स्वार्थाने बरबटलेला असल्याचे सांगून माणसांतील काम, क्रोध, मत्सर, मोह, माया आणि अहंकार नष्ठ झाल्यास त्याला देवत्व प्राप्त होते. असे आग्रही प्रतिपादन भक्ती स्थळाचे प्रमुख प-पू. गुरुराज स्वामी महाराज यांनी केले.तें दि. 1 रोजी न्यू शॉपिंग सेन्टर येथे इच्छापूर्ती हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठन व कलशारोहण सोहळ्यात आशीर्वचन प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर थोरलामठ चे प पू वेदांतचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांची तर प्रमुख अतिथी म्हणून माजीराज्य मंत्री बाळासाहेब जाधव, माजी जि. प. सदस्य माधव जाधव, काँग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे,भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस दिलीपराव देशमुख,माजी सभापती अ‍ॅड भारत चामे,माजी सभापती आयोध्याताई केंद्रे, मराठवाडा साहित्य परिषद चे अध्यक्ष सत्यनारायण काळे, केंद्र प्रमुख नंदकुमार कोणाले, नगरसेवक अभय मिरकले, नगरसेवक रवी महाजन, नगरसेवक संदीप चौधरी, डॉ ऋषिकेश पाटील, डॉ अमृत चिवडे, डॉ बालाजी साळुंके, प्राचार्य दिलीप माने,बाबुराव शेटकर, प्रा रामदास काटापल्ले,अ‍ॅड अजिंक्य चामे, यांच्या सह अनेक मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी प पू वेदांताच्चर्य दिगंबर शिवाचार्य महाराज आशीर्वचन प्रसंगी म्हणाले कीं संबंध विश्वा मध्ये हनुमान भक्तीसाठी प्रसिध्द असल्याचे सांगून मानवी जीवनामध्ये अत्यंत श्रद्धापूर्वक भक्ती केल्यास ख-या अर्थाने मोक्ष मिळतो. म्हणून प्रत्येकाने इश्वरावर प्रामाणिकपणे भक्ती करण्याचे आवाहन केले.प्रारंभी भल्या पहाटे रामप्रहारी मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा विरभद्रेश्वर स्वामी मुखेडकर,रायलिंग स्वामी कल्लूरकर यांच्या हस्ते करण्यात आला.या समयी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्या-या चा सत्कार मान्यवरांच्या हस्ते व मंदिर उभारणीमध्ये कार्यकरणा पदाधिकार्याचा सत्कार प पू आचार्य गुरुराज स्वामी महाराजां च्या हस्ते करण्यात आला.यावेळी कळारोहणास मदत करणाऱ्या बाईलेकीस शंकराची मूर्ती देवून सन्मान करण्यात आला.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाकांत नागठाणे यांनी सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा संतोष रोडगे यांनी मानले. सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर संस्थान चे श्रीहरी कोटलवार, गिरीश शेटकर, सूर्यकांत शेटकर, लक्ष्मण अलगुले, न्यू शॉपिंग सेंटर युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड प्रितम भूतडा, प्रकाश बेल्लाळे, उमाकांत कोणाले, मारुती मुस्तापुरे, बालाजी ढाकणे,प्रकाश बुलबुले, दिलीप गादेवार, सुधीर मेनकुदळे, महेश भालके,तुकाराम साबणे, महादेव स्वामी, मोहन पाटील ,अ‍ॅड स्वप्नील व्हत्ते, अ‍ॅड पंकज शेळके,यांच्या सह महिला मंडळानी विशेष परिश्रम घेतले.रात्री च्या वेळी लिंगेश्वर भजणी मंडळानी भजनाचा जागर घालून नागरिकांची व भाविक भक्तांची मने जिंकली.

About The Author

error: Content is protected !!