राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य विक्रीवर कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य विक्रीवर कारवाई

लातूर :  राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उप-आयुक्ता श्रीमती उषा वर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्हयाचे अधीक्षक  केशव गो. राऊत, राउशु, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १/३/२०२३ व दि. २/३/२०२३ रोजी कासार शिरसी, ता. निलंगा, जि. लातूर व बामणी, ता. उदगीर, जि. लातूर येथे राज्य उत्पादन शुलक, उदगीर विभागाने छापे मारुन ५ गुन्हे नोंदविले आहेत. सदर गुन्हयांमध्ये (कर्नाटक निर्मित विदेशी दारु व बियर मद्यसाठा ) हातभट्टी गावठी दारु १०० लिटर, ताडी २२ लिटर व देशी दारु १८० मिलीच्या बाटल्या असा एकूण २०५०५/- रुपयांचा मुद्देमाल मिळूण आला आहे.

सदरच्या कारवाईमध्ये उदगीर विभागाचे निरीक्षक रमेश एम. चाटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान संतोष केंद्रे व चालक विक्रम परळीकर यांचा सहभाग होता.

अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे केशव राऊत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!