उदगीरात संगीतमय भागवत कथेस प्रारंभ

उदगीरात संगीतमय भागवत कथेस प्रारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.प्रा. विजयकुमार बाबाराव पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भागवत कथेसाठी ह. भ .प भागवताचार्य वामन महाराज मुरुंबिकर यांच्या सुमधुर संगीतमय भागवत कथेचा त्यांनी उपस्थित भाविक भक्त श्रोत्यांना आपल्या वाणीने मंत्रमुग्ध केले.या कथेस प्रमुख उपस्थिती अरविंद पाटील एकंबेकर, शिरीष पाटील, विशाल पाटील, अश्विनी पाटील, दुर्गा पाटील, गोविंदराव पाटील शिरोळकर ,कुमोदिनी देशमुख, अभिजीत पाटील, विश्वंभर शिंदे, चैतन्य महिला भजनी मंडळ अंबाजोगाई, संतोषी माता भजनी मंडळ उदगीर यांची यावेळी उपस्थिती होती. या संगीतमय भागवत कथेस हार्मोनियमची साथ संगत शंकर जाधव यांनी केली तर तबल्याची साथ संगत विनोद लाळे करीत आहेत. भागवत कथा ही 5-3 – 2023 या तारखेपर्यंत होणार असून 6-3 -2023 वार सोमवार रोजी सकाळी 10 ते 12 श्री. ह .भ. प अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने या भागवत कथेचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाचा उदगीर शहरातील व परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भगवानराव पाटील शिरोळकर, श्रीमती मीनाक्षी पाटील शिरोळकर,विशाल पाटील, विराज पाटील, शिवांगी खताळ पाटील व समस्त शिरोळकर परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे स्थळ – स्वग्रही शिवाजी सोसायटी, बस स्टॅन्ड समोर उदगीर,हे आहे.

About The Author

error: Content is protected !!