सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा निमित्ताने आयोजित विविध स्पर्धेच्या विजेत्यांचे पारितोषिक वितरण
उदगीर (एल.पी.उगीले) : महामानव नुसतेच डोक्यावरून न जाता त्यांचे विचार डोक्यात गेले पाहिजेत, या उद्देशाने प्रेरित होऊन कुळवाडी भूषण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंती निमित्त विविध सामजिक उपक्रमांसोबताच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी भव्य सार्वजनिक खुल्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये लोककला स्पर्धा, भाषण स्पर्धा, स्वतंत्र व समूह पोवाडे गायन स्पर्धा – देशभक्ती व शिवरायांच्या गाण्यावर नृत्य स्पर्धा अशा विविध सार्वजनिक स्पर्धांमध्ये उदगीर शहर, तालुक्यातील व इतर जिल्ह्यातील असे एकूण 30 शाळेतील व महाविद्यालयातील बाल,कुमार अशा एकूण 900 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून स्पर्धेचा लाभ घेउन आपली कला सादर केली होती.त्या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा गुरुवार 02 मार्च 2023 रोजी नगर पालिका मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.आयोजित सर्व स्पर्धांचे परीक्षण,निरीक्षण करण्यासाठी विविध क्षेत्रातील एकूण सहा तज्ञ परीक्षक नेमण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या गुण निरीक्षणानुसार प्रथम, द्वितीय, तृतीय वैयक्तिक व समूह असे स्पर्धक निवडले गेले. या निवडलेल्या व सहभागी सर्व कलाकारांना, स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवजन्मोत्सव चषक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी उदगीर चे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, कृ.ऊ.बा.स. माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी उपसभापती रामराव बिरादार, उदगीर चे माजी उप नगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले,प्रसिद्ध उद्योजक जयवंतराव पाटील,शिवाजीराव केंद्रे, सुरशेठवार , नामदेवराव कदम, भाजपा शहर अध्यक्ष मनोज पुदाले, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष समीर शेख, शिवसेना तालुका अध्यक्ष कैलास पाटील,उदगीर शहर पोलिस स्टेशनचे पी.आय परमेश्वर कदम, सौ पुष्पाताई जाधव, अनिताताई जगताप,माजी मुख्याध्यापक रामभाऊ हाडोळे, दालमिल असोशियन अध्यक्ष सुदर्शन मुंडे, माजी न.प.सदस्य गजानन साताळकर, ॲड.दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, सुदर्शनजी बिरादार प्रा.यशवंत बिरादार, ॲड.सचिन हुडगे, ॲड.ज्ञानोबा सोनवाड, ॲड.वर्षाताई कांबळे, सूरज पोस्ते,ज्ञानोबा मुंडे, प्रशांत जगताप विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सतीश पाटील मानकिकर, बिपिन पाटील, प्रा.मदन पाटील,शहाजी पाटील, विक्रांतभोसले. विश्वजीत पाटील.राहुल आतनुरे,यशवंत पाटील,प्रमोद कलोजी, प्रा.अविनाश पाटील, प्रा.विष्णू अलट, प्रा.ज्ञानेश्वर बिरादार, हिमांशू पाटील,अंकुश ताटपल्ले, पुंडलिक जाधव,सुग्रीव बिरादार,पंकज कलानी, विकास बिरादार श्रीकांत गोपडे, विक्रम घोगरे, प्रतीक शिंदे, अजिंक्य पाटील, विवेक जाधव, अनिल बिरादार, बालाजी मैनाळे, बाबासाहेब सूर्यवंशी,भाऊसाहेब जांभळे, महेश बिरादार इत्यादी उपस्थित होते.
