देवणीत छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज आणि संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त विचारांचा जागर
देवणी (प्रतिनिधी) : विचार परिवर्तन हे सर्व परिवर्तनाची मूळ आहे, आणि महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून समाज परिवर्तन होणे हे अपेक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझी अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करा. अर्थातच महापुरुषांचे अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करणे आपले आद्यकर्तव्य आहे, आणि त्यामुळेच आपण ते करण्यासाठी आपल्या प्राणाची सुद्धा बाजी लावण्यास कमी पडता कामा नये. महापुरुषांच्या विचाराचा प्रचार, प्रसार होण्यासाठी महापुरुषांची विचार लोकांना समजण्यासाठी प्रबोधनाच्या कार्यक्रमाची आवश्यकता असते.समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या चतुसूत्रीवर आधारित समाज रचना निर्माण करण्यासाठी सर्व मूलनिवासी महापुरुषांनी कार्य केले, तेच कार्य पुढे नेण्याचं काम आज बामसेफ व बामसेफच्या सर्व सहयोगी संघटना करत आहेत.देवणीत बामसेफ भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ व प्रोटान च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्य प्रभारी बालाजी कांबळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बामसेफ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्हि. व्हि. जाधव उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. स्वराज्यात रयत सुखी होती. स्वराज्य हे केवळ हिंदूंसाठी नव्हे तर अठरापगड जातीच्या व सर्व धर्मातील लोकांच्या वर होणारा अन्याय अत्याचार रोखण्यासाठी निर्माण केलेले होते. शिवाजी महाराजांच्या काळात होणाऱ्या लढाया या धर्मांसाठी नव्हे तर साम्राज्य विस्तारसाठी होत असत परंतु आज लोक शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हिंदू-मुस्लीमात फूट पाडण्याचे काम करत आहेत. असे मत प्रा. अजित जाधव यांनी व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अनेक मुस्लिम सरदार महाराजांच्या अंगरक्षक सारख्या महत्त्वाच्या हुद्द्यावर होते. त्याचे अनेक दाखले देत छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजे असल्याचे मत डॉ. जीमेल आत्तार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात व्हि. व्हि. जाधव यांनी देवणी ही क्रांतीची भूमी आहे, असे सांगत महापुरुषांच्या कार्यामुळेच आज आपण सन्मानाने जगत आहोत. बळीराजा, संत तुकाराम महाराज, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना इथल्या व्यवस्थेने धोकाबाजी करून संपवलेला आहे. त्यांचे विचार संपवण्यासाठी त्यांचे साहित्य नष्ट केले , जे संपवता आले नाही ते विकृत केले, वर्तमान परिस्थिती सुद्धा बहुजनांना संपविण्याचेच काम करत आहे. वर्तमान परिस्थितीत ईव्हीएम चा वापर करून लोकशाही धोक्यात आणली आहे. जवळजवळ संपविलीच आहे. लोकशाही वाचवायची असेल तर बामसेफच्या वतीने आयोजित ईव्हीएम भंडाफोड परिवर्तन यात्रा दिनांक ६ मार्च 2023 रोजी लातूर येथे येत आहे, या यात्रेत देवणीतील सर्व शेतकरी, व्यापारी यांच्यासह सर्व लोकांनी या परिवर्तन यात्रेत सामील होण्याचे आवाहन बामचिपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्हि. व्हि. जाधव यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विजयकुमार लुले , ॲड. मूळभागे देविदास पतंगे माजी सरपंच, पोलीस निरीक्षक शेख , संग्राम पातळे जिल्हाध्यक्ष प्रोटान इत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन मजीफ शेख बी. एम. पी. तालुका अध्यक्ष देवणी, प्रा. डॉ.पी. आर. मोरे मराठवाडा विभागीय अध्यक्ष, प्रोटान,डॉ. मधुकर कांबळे तालुका अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, गुलाम रसूल शेख, जितेंद्र सूर्यवंशी, तुकाराम रणदिवे, प्रवीण रणदिवे, विनोद शिंदे, शिवानंद सूर्यवंशी यांच्यासह बामसेफ व सर्व सहयोगी संघटनाचे सर्व पदाधिकारी यांनी केले.
