अंगात आलाय देव,पुढे अकरा रुपये ठेव,रामचंद्र पाटील इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थ्यांनी केला अंधश्रद्धा निर्मूलनचा जागर

अंगात आलाय देव,पुढे अकरा रुपये ठेव,रामचंद्र पाटील इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थ्यांनी केला अंधश्रद्धा निर्मूलनचा जागर

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : वलांडी येथील रामचंद्र पाटील इंग्लिश स्कुल चे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. त्यात चिमुकल्यानी विविध गीतावर उत्कृष्ट नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मनोरंजनासोबतच विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनासाठी अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित विविध कार्यक्रम राबवून वैज्ञानिक दृष्टिकोनाची समाजाला गरज पटवून देण्याचा प्रयत्न केला. चिमुकल्यांच्या या प्रयत्नांना ग्रामस्थांनी दाद दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार धर्माजी सोनकवडे तर प्रमुख पाहुणे म्हणून देवणीचे गटशिक्षणाधिकारी बोइनवाड , केंद्र प्रमुख येलमटे , कार्ले , व्यंकटराव पाटील, महेश बंग, जब्बार मोईन , दिनेश पाटील, शादूल बौडीवाले, संगमेश्वर महाराज, उद्धव पाटील, सोमनाथ उमाटे उपस्थित होते. कोरोना काळात सर्व शाळा बंद असल्यामुळे लहान मुलांना आपले कलागुण सादर करण्याची संधी गेल्या दोन ते तीन वर्षापासून मिळाली नव्हती, त्यामुळे या स्नेह संमेलनात विद्यार्थी आणि पालक यांच्यात मोठा उत्साह दिसून आला. यात लहान मुलांनी विविध प्रकारच्या मराठी व हिंदी गाण्यावर बहारदार नृत्य सादर केली. तसेच या वेळी स्व. सूर्यभान रामचंद्र पाटील यांच्या ‘माझ्या स्वप्नातील शाळा’ या उपक्रमाची चित्रफीत मोठया पडद्यावर पालक व गावातील जनतेला दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युसूफ नरोने यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरसनाळे एम. बी., योगिता मलवाडे , अर्चना रासुरे, मसरत नरोने, माधव गायकवाड, श्रीमती गायकवाड, पवार , निशा तांबोळी, नामदेव भोसले, नागेश बनसोडे, श्रीमती काळे यांनी परिश्रम घेतले. आभार उद्धव पाटील यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!