सेंद्रिय शेती काळाची गरज-उपप्राचार्य डॉ.धनंजय गौड

सेंद्रिय शेती काळाची गरज-उपप्राचार्य डॉ.धनंजय गौड

उदगीर (एल.पी.उगीले) : आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो.सध्या कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तर दुसरीकडे नैसर्गिक साधनाचा वापर करून सेंद्रिय शेती करण्यावर पण भर दिला जात आहे.पारंपरिक बी बियाणे चा वापर केल्यास विषमुक्त रसायनाच्या वापराची गरज भासणार नाही.परंपरागत शेती करताना पिकाचे अवशेष,शेण, गोमुत्र यातून शेणखत तयार करून यांचा वापर केल्यास शेतीची सुपकिता टिकून राहते. त्यामुळे आज सेंद्रिय शेती की काळाची गरज असल्याचे वक्तव्य उपप्राचार्य डॉ. धनंजय गौड यांनी केले.येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबीर दिनांक 25 फेब्रुवारी 2023 ते 03 मार्च 2023 दरम्यान मौजे देवर्जन (हत्तीबेट) ता. उदगीर येथे होत आहे. दुपारच्या सत्रात डॉ. गौड हे ‘सेंद्रिय शेती’ या विषयावर बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. राहुल पुंडगे होते, तर स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे शैक्षणिक संचालक डॉ. उमाकांत पाटील, महाविद्यालयाचे परीक्षा प्रमुख डॉ. एस. एन. जाधव,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे,डॉ. एस. व्ही. चव्हाण, प्रा. आकाश कांबळे, तातेराव कांबळे याची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. गौड म्हणाले की, हरितक्रांती च्या अगोदर परंपरागत शेतीच केली जात होती.शेणखताच्या वापरामुळे पिकाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते, तसेच जमिनीची सुपीकता कायम टिकून राहते. ज्यामुळे आपल्याला पौष्टिक अन्न धान्य खाण्यास मिळते,असे ही ते म्हणाले.यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्रा. राहुल पुंडगे यांनी सेंद्रिय शेती आणि आधुनिक साधने यांच्या वापरा बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी वैभव सोमवंशी यांनी केले, तर आभार प्रबुद्ध फिरंगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!