शिबिरातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो – प्रा.कु.नयन भालेराव

शिबिरातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो - प्रा.कु.नयन भालेराव

उदगीर (एल.पी.उगीले) :विद्यार्थ्यामध्ये अनेक कलागुण असतात. शिक्षणासोबतच त्यांना आपल्यात काय विशेष आहे, जेणेकरून त्या कलेचा अधिक विकास होईल. व त्यांना पुढे त्या कलेत संधी मिळेल. यासाठी त्यांना एक व्यासपीठ हवे असते. राष्ट्रीय सेवा योजनाचे शिबीर हे विद्यार्थीसाठी आपल्यात कोणते कलागुण आहेत, यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून देते.जेणेकरून विद्यार्थी मनमोकळे पणाने व्यक्त होण्यासाठी मदत होते. असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या प्रा. कु. नयन भालेराव यांनी केले.

येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबीर मौजे देवर्जन (हत्तीबेट) ता. उदगीर येथे होत आहे, सकाळच्या सत्रात प्रा.कु. नयन भालेराव या बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाळ पवार होते.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे,पत्रकारिता व माध्यमशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे,प्रा. आकाश कांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी नुच्चे,अमोल भाटकुले यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना प्रा. कु.नयन भालेराव म्हणाल्या की,विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात एकदा तरी एन एस एस शिबीर केले पाहिजे, कारण या शिबिरामध्ये केवळ श्रमदान केले जाते असे नाही तर त्यांच्या मानसिक , बौद्धिक, शारीरिक,आरोग्य बाबत देखील विचारमंथन केले जाते. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे कार्य देखील या शिबिरातून होते, असे ही त्या म्हणाल्या.यावेळी प्रा. आकाश कांबळे यांनी आपल्या मनोगतात कविता आणि चारोळी म्हणत विद्यार्थ्यांमध्ये हर्षउल्हास निर्माण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश जगताप यांनी केले तर आभार वैभव सोमवंशी या विद्यार्थ्यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख असिफ, स्लोक स्वामी,शंकर पाटील, रुपेश मोरे, बालाजी कुमठे, योगीराज पांचाळ, राम पवार, राज पवार, सुरज माळेगावे, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!