तरुणांनी समाजमाध्यमे वापरताना काळजी घ्यावी – प्रा. राहुल पुंडगे

तरुणांनी समाजमाध्यमे वापरताना काळजी घ्यावी - प्रा. राहुल पुंडगे

उदगीर (एल.पी.उगीले) : सध्याचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे.एखादी घटना घडली तर अगदी क्षणात आपल्या पर्यंत कशी पोहचेल, अशी साधने आज उपलब्ध आहेत. आणि ही साधने अतिशय लोकप्रिय असल्यामुळे तरुणवर्ग याकडे लवकर आकर्षित होत आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ही तरुणाई या समाज माध्यमावर सक्रिय असते. ते फेसबुक,व्हाट्स अप, इंस्टाग्राम,ट्विटर,युट्युब इ.माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. तरुणांना व्यक्त होण्यासाठी ही माध्यमे अत्यंत उपयोगी ठरतात. आपली आवड-निवड, विचारांची देवाण-घेवाण, नवीन लोकांशी संवाद, तात्काळ संदेश आदी बाबीसाठी ही माध्यमे तरुणांना एक व्यासपीठ निर्माण करून देतात. असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील पत्रकारिता व माध्यम शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांनी केले.

येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबीर मौजे देवर्जन (हत्तीबेट) ता. उदगीर येथे होत आहे. दुपारच्याच्या सत्रात प्रा. राहुल पुंडगे हे ‘समाजमाध्यमे आणि तरुण’ या विषयावर बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाळ पवार होते.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे,प्रा. आकाश कांबळे, प्रा. नयन भालेराव, विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी नुच्चे,अमोल भाटकुले यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना प्रा. पुंडगे म्हणाले की,आपल्या समाज माध्यमांनी तरुणांच्या आवडी-निवडी प्रमाणे फिचर देऊन त्यांना मोकळे पणाने व्यक्त होण्याची संधी दिली आहे. सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजन इ.क्षेत्रातील घडणाऱ्या घटना, घडामोडीवर बिनधास्तपणे हे तरुण आपली मतं मांडताना दिसतात. आज या समाज माध्यमा मध्ये आपली पोस्ट अधिक लोकांनी पहावी, वाचावी, लाईक करावी. यासाठी स्पर्धा लागलेली आहे.फेसबुक युट्युब, इंस्टाग्राम वर वेगवेगळ्या रील तयार करून तरुण व्यक्त होतात. सेक्स,प्रेम,स्वतःच्या भावना ज्या सार्वजनिक व्यासपीठावर मांडणे त्यांना अवघड जाते, ते सहज रित्या या माध्यमातून मांडताना दिसतात. असे असले तरी दुसरीकडे मात्र तरुणांना त्याच्या आवडी-निवडी प्रमाणे माहिती पोहचवून त्यांना या माध्यमानी आहारी बनविले आहे. तरुणाचे वाचन कमी झाले आहे. समाज माध्यमावरील माहिती सत्य आहे, असा एक वर्ग तयार होतो आहे. माहितीची पडताळणी न करता ती एका क्षणात परसरविली जाते. हे धोकादायक आहे. आपल्या पोस्ट द्वारे कोणत्याही व्यक्तीचे, समाजाचे,नुकसान किंवा अपमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.असे ही ते म्हणाले.यावेळी अध्यक्षीय मनोगतात डॉ. गोपाळ पवार यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात कोण-कोणते शैक्षणिक बदल होणार आहेत,याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमर तांदळे यांनी केले तर आभार वैभव सोमवंशी या विद्यार्थ्यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश जगताप, शेख असिफ, सुयश स्वामी,शंकर पाटील, दिनेश हाकेळे, पृथ्वीराज दवणीपुरगे, अनिल देसाई, आदित्य कमलापुरे, रितेश मरे,रुपेश मोरे, बालाजी कुमठे, योगीराज पांचाळ, राम पवार, राज पवार, सुरज माळेगावे, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!