निराधारांना आधार देण्यासाठी लातूर जिल्हा बँक निराधारांच्या दारात!

निराधारांना आधार देण्यासाठी लातूर जिल्हा बँक निराधारांच्या दारात!

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुकातील भाकसखेडा व गंगापूर या गांवात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएमच्या व्हॅनचा वापर करून या दोन्ही गांवातील लाभार्थी यांना त्यांच्या दारात जाऊन तहसीलदार उदगीर रामेश्वर गोरे यांनी निराधाराला जमा केलेले दोन महिन्याचे पेन्शन वाटप करण्यात आले. भाकसखेडा गांवापासून ला.जि.म. स. बँकेची शाखा ५किमी दूर देवर्जन येथे आहे, व त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहन सुविधा नाही. म्हणून भाकसखेडा – गंगापुर वि.का.स.से. सो.चे तरुण चेअरमन विवेक जाधव यांनी सर्व सामान्य माणसाला गांवातच सोय करावी, अशी मागणी बँकेचे अध्यक्ष युवकाचे हृदयस्थान आमदार धिरजभैय्या देशमुख व बँकेच्या संचालिका श्रीमती लक्ष्मीताई चंद्रशेखर भोसले यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने तात्काळ दखल घेत कर्तव्यदक्ष तालुका फिल्ड अधिकारी हणमंतराव पवार यांनी शनिवारचे नियोजन करून लातूर जिल्हा बँकेची व्हॅन उपलब्ध करून दिली. व आपण स्वतः ग्रामीण भागातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून युवा नेत्या व उदगीर तालुक्यातील वि.का.स.से.सो. तोंडचिर येथील संचालिका प्रितीताई भोसले यांच्या हस्ते निराधाराच्या दारात जाऊन रोख रक्कम वाटप करण्यात आली .

या कार्यक्रमाचे आयोजन वि.का.स. से.सो. चेअरमन विवेक जाधव ,व्हा. चेअरमन हंसराज माळेवाडे,सरपंच अर्चना खेडकर, उपसरपंच अरविंद मोरे व सर्व सन्माननीय सदस्य सोसायटी व ग्राम पंचायत तसेच दयानंद मोरे, सुनिल जाधव, लक्ष्मण बिरादार,राम जाधव, अनंत जाधव , लिंबाजी खेडकर, माजी सरपंच तुकाराम कांबळे,त्रिंबक कांबळे, गोरख कांबळे यांनी केले होते. यावेळी पंडीतराव जाधव मंडळ अधिकारी ,मनोहर केंद्रे कर्मचारी जिल्हा बँक, व्हॅन चालक हरिदास गुडसुरे, किशोर कसबे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला पुरुष उपस्थित होते. यावेळी २२५ कुंटुबाला याचा लाभ झाला. ही व्हॅन आल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात निराधारांना पायपीट करून पाच किलोमीटर पर्यंत धक धक करत जाणे तळले, जिल्हा बँकेच्या प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी व्यायाम दारात पाठवल्या बदल सर्व सामान्य जनतेचे, निराधार योजनाचे लाभार्थी, जेष्ठ नागरिक यांनी लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. धिरज भैय्या देशमुख यांचे आभार व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!