बालभारतीच्या सदस्यपदी प्रा.गणेश बिरादार

बालभारतीच्या सदस्यपदी प्रा.गणेश बिरादार

उदगीर (एल.पी.उगीले) : पुणे येथील महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती महामंडळ (बालभारती) च्या हिंदी विषयाच्या सदस्यपदी उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील प्रा. गणेश बिरादार यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. गणेश बिरादार हे गेल्या अनेक वर्षापासून उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरच्या सामाजिक चळवळीत त्यांचे योगदान राहिले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानी अनेक विषयांवर समाज प्रबोधनाचे कामही केले आहे.हिंदी भाषेतील त्यांचे ज्ञान लक्षात घेवून पाठ्यपुस्तक महामंडळाने त्यांची निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे, प्रभारी प्राचार्य एस. एन. शिंदे,सहकारी प्राध्यापक, मित्रपरिवार अभय पारसेवार, राहुल अंबेसंगे, गिरीश (बंटी) अंबेसंगे, रमेश झिल्ले, अमोल अनकल्ले, राजकुमार नलंदवार, बसवेश्वर कोरे या मित्रपरिवारांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!