उमा चौक येथील हिंदु खाटीक स्मशानभूमी येथे डॉ. संतूजी लाड यांची जयंती

उमा चौक येथील हिंदु खाटीक स्मशानभूमी येथे डॉ. संतूजी लाड यांची जयंती

उदगीर (एल.पी.उगीले) : दि. ४ मार्च २०२३ रोजी हिंदू खाटीक समाजाच्या स्मशान भूमीच्या जागेत कलाल लोकांची स्मशान भूमी येथे हिंदू खाटीक समाजचे सचिव नरसिंग पुंडलीक गठडे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय खाटीक समाज लातूर जिल्हाध्यक्ष तथा विश्व हिंदु परिषदेचे उदगीर शहराध्यक्ष व दै. एकजूट लोकजागृतीचे संपादक महादेव घोणे यांनी हिंदु खाटीक समाजाचे महापुरुष डॉ. संतुजी लाड यांची १८३ वी जयंती साजरी केली . यावेळी डॉ. संतूजी लाड यांच्या प्रतिमेस नरसिंग गठडे यांच्या हस्ते पुस्पहार अर्पण करण्यात आले . याचसोबत भाजपाचे युवा नेते नवजोत शिंदे, महाराष्ट्र संघर्ष अभियान श्रमिक संघचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सुर्यवंशी, संतुजी ब्रिग्रेड बालाजी साबणे, अँड. डॉ. श्रावणकुमार माने यांनीही पुष्पहार अर्पण करून वंदन केले . यवेळी महादेव घोणे यांनी डॉ. संतुजी लाड यांचे जिवन परीचय सांगितले. यावेळी बालाजी मांजरे, शाम मुरारीकर, राजू दिवटे, करण मांजरे, मनोज सदानंदे, शक्ती साबणे, शेखर पिंजरे, बालाजी दिवटे, मंगल दिवटे, यादव खडककोरे, नरेश कांबळे, सुनील खडके आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!