स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लाईनमन दिवस साजरा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लाईनमन दिवस साजरा

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील भिसे वाघोली येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपकेंद्र या सब स्टेशन अंतर्गत येथे कार्यरत असलेले श्री जनक कांबळे व त्यांचे सहकारी आकाश कांबळे हे भिसे वाघोली, वाडी वाघोली, खुंटेफळ तीन गावांमध्ये अहोरात्र काम करत आहेत त्यांचा दि 4 मार्च लाईन मन दिवस असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शाल फेटा व पुष्पहार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. लाईन मन म्हणजे 24 तास जनतेच्या सेवेमध्ये असणारा घटक रात्री अपरात्री कधीही त्यांना डीपी चा फ्युज गेला आहे किंवा कुठे वायर तुटले आहे आणि रस्त्यावर पडले आहे असा फोन आला तर कितीही रात्रीला उठून घटनास्थळावर येऊन त्या ठिकाणी सर्विस दिली जाते.

कोरोनाच्या काळामध्ये सर्व जनता आपापल्या घरी थांबलेली असताना लाईन मेन मात्र जनतेच्या सेवेसाठी रात्र आणि दिवस सेवेमध्ये तत्पर होते लाईट हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे आणि ती सतत चालू ठेवण्यासाठी लाईन मेन प्रयत्नशील असतात आज जवळपास चार-पाच वर्षापासून कांबळे या लाईनमनची ड्युटी या तिन्ही गावांतर्गत आहे आणि अतिशय चांगली सेवा सर्व गावकऱ्यांना मिळत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने व भिसे वाघोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी स्वाभिमानीचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल, युवा जिल्हाध्यक्ष नवनाथ शिंदे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यांच्या हातून असच सत्कार्य घडत रहावे. या प्रसंगी हमीद पटेल, मुजाफर सय्यद, जगन्नाथ भिसे, शिवाजी वायाळ, महादेव मांदळे, खय्युम सय्यद, मनोज अंदुरे, अशोक पानखडे इत्यादी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!