आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ!

आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ!

अहमदपूर (गोविंद काळे) : मौजे टाकळगाव ता चाकूर येथे आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ संपन्न झाला. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत टाकळगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या 65 लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन आणि जनसुविधा योजनेअंतर्गतच्या 20 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ता व नाली बांधकामाच्या कामाचा समावेश होता. यावेळी आ.बाबासाहेब पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.

प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्ती समिती टाकळगाव अध्यक्ष नानासाहेबजी सावंत, माजी उपसभापती पद्माकरराव पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, तालुकाध्यक्ष विलासराव पाटील, तालुकाप्रमुख दिलीपराव पाटील, माजी संचालक बालाजीदादा सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष गंगाधरअप्पा, अक्कानरू, तालुका कार्याध्यक्ष भानुदासराव पोटे, तालुका उपाध्यक्ष गणपतराव नितळे, तालुका उपाध्यक्ष गणपतराव कवठे, तालुका उपाध्यक्ष बाबुराव माने, माजी उपसरपंच मेघराज पाटील, मेघराज पाटील, अशोकराव पाटील, रामचंद्र घाटकार सर, अंतेश्वरराव माने पाटील, विवेक पाटील, गणपतराव सावंत, नामदेव मांडुरके, व्यंकटराव साळुंखे, दिलीप आवाळे, जयंतराव सावंत, गुणवंतराव पाटील, शनील माने, शेळके सर, प्रकाश माने, विठ्ठलराव मांडुरके, प्रताप सावंत, माजी उपसरपंच इंद्रजीत माने, ज्येष्ठ नेते अशोकराव पाटील, विष्णूजी तिकटे, व्यंकट मुंडकर, अशोकराव पडिले, जगन्नाथ आयनुले, विश्वनाथ घटकार, नामदेव मांडुरके, गणपतराव पाटील, अमोल जंपनगिरे, उत्तमराव पाटील, समाधान जाधव, ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!