शिवजन्मोत्सव स्पर्धेत जय-हिंद च्या विद्यार्थ्यांनी पटकावला द्वितीय क्रमांक

शिवजन्मोत्सव स्पर्धेत जय-हिंद च्या विद्यार्थ्यांनी पटकावला द्वितीय क्रमांक

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवसप्ताह आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर संचलित जय-हिंद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित समूह गटातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.या समूह गटात अक्षरा जगताप, समीक्षा पाटील, समीक्षा हल्लाळे, अवनी मोहिते, श्रद्धा सुरवसे, अपेक्षा धोंडगे, उदय जमादार, अभिषेक स्वामी, भावेश भालके, आनंद जगताप, पार्थ कंकरे, अभिनंदन गायकवाड, प्रतीक दुधाळे, सूरज पाटील यांचा समावेश होता. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर जगताप, प्राचार्य संजय हट्टे, सांस्कृतिक प्रमुख ज्योती स्वामी, प्राचार्य मनोरमा शास्त्री, अतेंद्र सिंग, सतीश वाघमारे, आविष्कार मडिले, पत्रकारिता व माध्यमशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!