लायन्स क्लब लातूर सेंट्रल संचलित सद्गुरु माऊली डायबेटिस केअर सेंटर द्वारा आयोजित फुल बॉडी चेकअपशिबिराचे डॉ. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर (एल.पी.उगीले) : लायन्स क्लब लातूर सेंट्रल संचलित सद्गुरु माऊली डायबेटिस केअर सेंटर द्वारा आयोजित फुल बॉडी चेकअप शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन लायन्सचे पूर्व प्रांतपाल डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. शिबिराचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर निखिल दरक होते. प्रारंभी लायन्सचे पूर्व प्रांतपाल डॉ. गोपाळराव पाटील, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर निखिल दरक, तसेच लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे या मान्यवरांचा लायन्स क्लब लातूर सेंट्रलच्या वतीने सत्कार करण्यात आला. लायन्स क्लब लातूर सेंट्रलचे अध्यक्ष प्रसाद हंचाटे, सचिव लॉ. रवींद्र आसोपा, कोषाध्यक्ष लॉ.राजेश खंडेलवाल, पी आर ओ ला. अक्षय डावरे, पास्ट प्रेसिडेंट लॉ. राजेश पत्रिके, पास्ट प्रेसिडेंट लॉ. चंद्रशेखर धमगुंडे, प्रकल्प प्रमुख लॉ. डॉ. श्यामसुंदर सोनी, प्रकल्प उपप्रमुख लॉ. भरत हंचाटे व क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. क्लबचे आधारस्तंभ ज्येष्ठ पत्रकार,लोकाधिकार प्रमुख तथा लोकाधिकार वार्ताचे संपादक व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते सत्कारमूर्ती लॉयन्सचे पूर्व प्रांतपाल डॉ. गोपाळराव पाटील यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. निखिल दरक यांना क्लबचे पूर्व प्रेसिडेंट ला. राजेश पत्रिके यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.