9 मार्च रोजी उदगीरात मोफत आरोग्य तपासणी व सर्व रोगनिदान शिबिर

9 मार्च रोजी उदगीरात मोफत आरोग्य तपासणी व सर्व रोगनिदान शिबिर

उदगीर (एल.पी.उगीले) :अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चारिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट व श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा बाल संस्कार साप्ताहिक सेवा केंद्र जय वीर हनुमान मंदिर रघुकुल मंगल कार्यालय समोर उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिर याचे आयोजन दिनांक 9 – 3- 2023 वार – गुरुवार या दिवशी सकाळी ठीक 10 ते सायंकाळी 07 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या शिबिराचा उदगीर तालुक्यातील, परिसरातील सर्व भावी – भक्तांनी सेवेकर्‍यांनी, कार्यरत सेवेकऱ्यांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्राचे तालुकाप्रमुख सचिन बामनपल्ले, जय वीर हनुमान मंदिर येथील स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख निवृत्ती जवळे, रेखा जाधव यांच्यासह समर्थ सेवेकऱ्यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!