आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन

आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई/नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात वयाच्या ६३ व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. रावसाहेब अंतापूरकर हे सर्वसामान्य कार्यकर्ते ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता.

१७ मार्च रोजी रावसाहेब अंतापूरकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सुरुवातीला त्यांनी नांदेड हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार घेतला. मात्र त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने २० मार्च रोजी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. अंतापूरकरांना कोरोनाचा अधिक त्रास होत होता. अखेर त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली पत्नी असा परिवार आहे. आज देगलूर इथे मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

About The Author