सिंधगाव येथे काँग्रेसचे हात से हात जोडो अभियान
लातूर (प्रतिनिधी) : लातूर ग्रामीण मतदार संघातील सिंधगाव येथे काॅग्रेसचे हात से हात जोडो अभियान संपन्न झाले. या अभियानांतर्गत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील संदेशाच्या पत्रकाचे व लातूर ग्रामीण चे आ.धिरज विलासराव देशमुख यांनी सिंधगाव गावास 57 लक्ष रुपये विकास निधीच्या पत्रीकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी रेणा कारखान्याचे व्हा चेअरमन अनंतराव देशमुख रेणापूर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्हा चेअरमन प्रमोद आबा जाधव, रेणा कारखान्याचे माजी संचालक भगवानराव पाटील, विद्यार्थी काँग्रेस रेणापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब करमुडे, सेवा दल काँग्रेस चे अध्यक्ष हनमंत तात्या पवार, सरपंच सुनील चेवले, उपसरपंच लक्ष्मण कुंभार, चेअरमन दत्तात्रय गंगणे, नृसिंह हरकटे चेअरमन, वैशलपायण लहाडे, जनक काळे, कमलाकर पंडगे, अनंत चेवले, लक्ष्मण चेवले, गोविंद पलमटटे, संतोष कुलकर्णी, नारायण गिरी, व्यंकट चेवले यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.