स्त्रीच्या त्यागातून आदर्शव्यक्तिमत्त्व घडते – अंजली वाघंबर
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील कमला नेहरू विद्यालय अहमदपूर आणि यशवंत प्राथमिक विद्यालय अहमदपूर या दोन्ही शाळेत 8 मार्च 2023 रोजी बुधवारी सकाळी – 11:00 वा. व 12:30 वा. जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ अंजली अरुण वाघंबर या उपस्थित होत्या. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीशक्ती असते स्त्रीच्या संस्कारातून व्यक्तिमत्वाची जडण घडण होत असते पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या पुरुषाला साथ देतात स्त्रीच्या त्यागातून आदर्श व्यक्तिमत्त्व घडत असते. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणामुळे आज जगात भारतात महिला मोठमोठ्या पदावर विराजमान आहेत हे सर्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना घटनेत पुरुषांच्या बरोबरीने दिलेला अधिकार म्हणून हे सर्व आज आपणास दिसत आहे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपल्यावर खूप आहेत या सर्व महापुरुषांच्या विचारांचा आपण सर्वांनी अंगीकार करावा असे प्रतिपादन आपल्या भाषणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली वाघंबर यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केले. कमला नेहरू विद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ दर्शना हेंगणे या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बुद्धधम्माच्या व्याख्यात्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ.अंजली अरुण वाघंबर यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी / विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मंगला सुरणर, बबिता वाघमारे, रंजना कांबळे, चीटलेवाड द्वारकाबाई, खुडे बेबीनंदा इ. महिला उपस्थीत होत्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कू. कांबळे समीक्षा, चंदेवाड किर्ती, वाघमारे समीक्षा, होळंबे वैष्णवी, होळंबे शिवानी, चित्ते अदिती, वाघमारे आरती, सुरणर कन्याकुमारी या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधूकर जोंधळे यांनी केले तर आभार मधूकर मदने यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत मिरजगावे , सुरेंद्र चोबळे, प्रदीप गायकवाड, सूर्यवंशी ज्ञानेश्वर, संजय बने यांनी परिश्रम घेतले.