महिलांनी स्वतः निर्णय घेतले तरच त्यांचे सबलीकरण झाले असं म्हणता येईल – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : महिला निर्णय घेऊन निर्णय देतील तेव्हा खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण झाले असे म्हणता येईल, परंतु प्राचीन काळापासून महिला पुरुषप्रधान व संस्कृती च्या वर्चस्वाखाली वावरत आहेत. त्यांच्यामधील सहनशीलता, तडजोडीची भूमिका ही त्यांची नैसर्गिक देण आहे. असे प्रतिपादन अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतची सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला पोलीस कृतत्वाचा मान,जिजाऊ सावित्रीच्या लेकीचा सन्मान ‘ या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारंभात सांगितले बोलत होते. यावेळी विचार मंचावर अहमदपूर पोलीस स्टेशन येथील महिला सहाय्यक फौजदार जसुमती केंद्रे, महिला पोलीस हवालदार सुमित्रा केंद्रे, महिला पोलीस आमलदार माधवी कोटेवाड, स्वाती डांगे या महिला पोलीस अमलदारांसह लातूर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला पोलीस आमलदार तथा महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी माया कांबळे यांच्यासह विजया गायकवाड, व्ही.पी. शिंदे तसेच, माया कांबळे यांच्या मातोश्री शांताबाई कांबळे यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी कार्यक्रमाचे संयोजक डॉ. सतीश ससाणे आदींची विचार मंचावर उपस्थित होती. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महिलांचा सन्मान तोच खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे. महिलांना समानतेची वागणूक मिळणे आवश्यक आहे, ज्या महिला बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतात त्याच आपले अधिकार आणि कर्तव्य यशस्वीपणे पार पाडतात, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सत्कार करून सन्मान केला.
तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींचा मान्यवर महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाचे विभागाच्या प्राध्यापिका डॉ. एस. बी. उप्पलवार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पदवी मिळाल्याबद्दल त्यांचाही प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाप्रसंगी सुमित्रा केंद्रे, माधवी कोटेवार, स्वाती डांगे, माया कांबळे, डॉ. एस. बी. उप्पलवार यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी समाजशास्त्रीय विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून ‘संस्कार ‘ या भीतीपत्रकाचे प्रकाशन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. सतीश ससाणे यांनी केले तर, सूत्रसंचालन डॉ.पांडुरंग चिलगर यांनी केले व आभार प्रोफेसर डॉ.अनिल मुंढे यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.