संगिता मोतीपवळे सार्वजनिक वाचनालयात जागतिक महिला दिनानिमित्य कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : जागतिक महिला दिना निमित्य संगिता मोतीपवळे सार्वजनिक वाचनालयात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सपन्न झाला.संगीता मोतीपवळे सार्वजनिक वाचनालय शिवनगर नविन वसाहत मलकापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्य कर्तृत्ववान महिला व महिला शिक्षकांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गुरुनाथअण्णा बिरादार हे होते, सत्कार मुर्ती माजी नगर सेविका श्रीमती जगदेवी काशिनाथ पोस्ते, श्रीमती पार्वतीबाई स्वामी व राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका अनिताताई यलमटे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.प.सदस्या सोनाबाई बळवंत पाटिल ,ग्रा.प.सदस्य जितेंद्र बोडके, तृप्ती पंडित हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ.माधवी जाधव ,अॅड रुकमिणी सोनकांबळे,मिनाक्षीताई स्वामी होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन प्रमुख पाहूण्याच्या हस्ते झाले. वाचक विद्यार्थिनी कांचन मोरे हीच्या नृत्य व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्याचे स्वागत ग्रंथपाल संगीता मोतीपवळे यांनी केले,यावेळी महिला दिना निमित्य कर्तबगार महिला म्हणून माजी नगर सेविका श्रीमती जगदेवी काशिनाथ पोस्ते, श्रीमती पार्वतीबाई स्वामी यांचा तर राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका अनिताताई यलमटे यांचा सन्मान चिन्ह, शाल, पुष्प व ग्रंथ भेट देऊन सरपंच गूरुनाथ बिरादार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यांवेळी महिला दिनानिमित्य एस.टी. काॅलनी येथील महिला शिक्षिका श्रीमती तृप्ती पंडित ,सौ हुरदळे,योगीता साळुंखे, सौ.रत्नमाला मठपती,सौ सिमा कुलकर्णी गुडसुरकर,सौ.जोशी,सौ.अर्चना शेवाळे,सौ.कडोळे,सौ.बेलूरे,सौ.मुढे,सौ,श्रध्दा सावळे, मठपती,सौ.आईनिले,सौ.पुजा मुळे,सौ.छाया गोरे,सौ.मंगला डांगे,सौ.राजवाडे सौ.जनाबाई भोसले आदी महिला शिक्षिकांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डाॅ.माधवी जाधव यांनी स्वत:चे आरोग्य सांभाळण्यासाठी आराग्याची घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले .डाॅ.मनिषा स्वामी यांनी महिलांनी कुंटुबाची जबाबदार सांभाळत असताना तंदुरुस्त राहण्यासाठी योगा व प्राणायामचे महत्व सांगून नियमित प्राणायाम व योगा करण्याचे आवाहन केले.अॅड रुक्मिणी सोनकांबळे यांनी महालांचे कायदेविषयक हक्क, कतृव्य व जबाबदारी यावर मार्गदर्शन केले.अनिता यलमटे म्हणाल्या की, मुलीनी मुलासारखे राहण्याचा प्रयत्न न करता अधिक मेहतीने अभ्यास करुन यशाच्या उंच शिखरावर जावे, परंतू हे करत असताना प्रत्येक गोष्टीत मुलासारखे राहण्याचा प्रयत्न करु नये. यासाठी आईने मुलीची मैत्रीन बनून वागावे, असे आवाहन केले.यावेळी ग्रा.प. सदस्य जितेंद्र बोडगे,ज्ञानेश्वरी बिरादार यांनी विचार मांडले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम मोतीपवळे यांनी संचलन सौ मीना हुरदळे तर आभार विजय बैले यांनी मानले.या कार्यक्रमास एस.टी.काॅलनी,नविन वसाहत, शिवनगर मुळे नगर भागातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल संगीता मोतीपवळे, सतन्नप्पा हुरदळे, अशोक कप्ते,शिवानंद मठपती, गौरी मोतीपवळे, चेतन बोईनवाड,शुभम सुपारे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी एस.टी.काॅलनी येथील सौ.वनमाला कप्ते,ज्ञानेश्वरी बिरादार, श्रावणी मोरे, श्रुती बिदरकर , सुलभा बिरादार ,कमल स्वामी, रत्नमाला भोसले, सुरेखा कोटलवार ,शामला पाटील, जयश्री राजुरे, जनाबाई भोसले, सुवर्णा कडोळे, लता भंडे, सरोजा कोटलवार, विजयमला मठपती ,विजयालक्ष्मी बिरादार, मीना हलकुडे, शिवगंगाबाई बिरादार, गीता बिरादार, अनिता सावळे, विजया कडोळे, लक्ष्मी व्दासे,पूजन मुळे, छाया गोरे, सुनीता कड्डे, जिजाबाई गिरी, विद्या बिरादार ,शोभा केंद्रे, सुजाता स्वामी, उर्मिला बोंद्रे यांच्या सह एस.टी.काॅलनी येथील मुली, महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.