माजी केंद्रप्रमूखांचा निरोप समारंभ थाटात संपन्न
दापका (एल.पी.उगीले) : सीमाभागातील बिदर जिल्हातील औराद तालुक्यातील भंडारकुमठा केंद्रामध्ये भवानी तांडा बावलगाव येथे कल्याण कर्नाटक ग्रामीण आभिवृध्दी मानव संसाधन, कृषी आणि संस्कृतीक संघाच्या वतीने सरकारी प्राथमिक शाळा भवानी तांडा बावलगाव शाळेला 65 इंची विशाल स्मार्ट टिव्हीआणि इनव्हेरटर देण्यात आले आहे. या संचाचा एकूण निधी 350000 इतका खर्च असुन उपयुक्त आहे. या शाळेत स्मार्ट क्लारूमचे उदघाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. याच बरोबर समुह संपन्नमुल केंद्र भंडारकुमठा केंद्राचे माजी केंद्रप्रमुख रणजीत शिंदे यांनी आपल्या केंद्रामध्ये अनेक नविन उपक्रम राबवत एक आदर्श व्यक्तीमत्व केंद्रप्रमुख म्हणून 5 वर्षे सेवा बजावली आहे. त्यांचा शाल,म्हैसुर फेठा,हार , छतपती शिवाजी महाराज मुर्ती देवून सत्कार करण्यात आला .निरोप समारंभ सुध्दा शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. याच बरोबर सध्याच्या केंद्रप्रमुख श्रीमती वैभवी कुलकर्णी यांचा सुध्दा शाल व म्हैसुर फेठा, हार घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे अध्यक्ष देवीदास जाधव हे होते तर,प्रमुखपाहुणे म्हणून प्रशांत शिंदे जिल्हा समन्वयक, गुरूनाथ वटगे तालूका संचालक, सोमनाथ बिरादार,संतोष वाडीकर तालूका कॉरडीनेटर, सामाजिक कार्यकर्ता शिवाजीराव पाटिल मुंगनाळ, ग्रामपंचायत अध्यक्ष माधव आचेगावे,शिक्षण संयोजक बलभीम कुलकर्णी, शिक्षण संयोजक संजीव म्हेत्रे, एम नयुम, संतोष रेड्डी कसाबचे अध्यक्ष डॉ शालिवाहन, अंकुशराव वाडीकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रकाश बर्दापूरे एकंबा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या शाळेचे मुख्याध्यापक सतिश मुळे हे एक आदर्श शिक्षक असून ,कृतीतून शिक्षणाचे ध्येय साध्य करणारा हाडाचा शिक्षक आहे,त्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम संपन्न झाला.