महेश बिरादार मोघेकर यांना मानद डाॅक्टरेट प्रदान
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : महेश बिरादार मोघेकर यांना ईंडीयन सेल्फ गव्हर्नमेंट डाॅक्टरेट युनिव्हरसिटी न्यु दिल्लीच्या वतीने मानद डाॅक्टरेट प्रदान करण्यात आली. शैक्षणीक कार्यात प्राथमिक ते माध्यमीक विद्यार्थ्यांच्या पायाभूत विकासासाठी २००१ पासून महाराष्ट्रासह सीमाभागातील शैक्षणीक विकासासाठी हेल्प ईंडिया ऑनलाईन फाऊंडेशशी समर्पीत होऊन व संकल्प सिद्धी पब्लीकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुण कौशल्य विकासासाठी घेतलेल्या विविध लेखी साहीत्य ऊपक्रमाची दखल घेत दिल्ली येथील ईंडीयन सेल्फ गव्हर्नमेंट व दिल्ली स्टेट गव्हर्नमेंट पॅरामेडीकल कौन्सीलच्या वतीने संविधान भवन येथे महेश बिरादार यांना मानद डाॅक्टरेट पदवीने सन्मानीत करण्यात आले.या वेळी हेल्प ईंडीया ऑनलाईन फाऊंडेशनचे जगदीश पारीख विद्यापीठाच्या चेअरमन डाॅ. अंजू भंडारी, डाॅ. जे.पी सींग सहनी यांची प्रमुख ऊपस्थीति होती.