महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राध्यापक विविध अभ्यास मंडळावर

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राध्यापक विविध अभ्यास मंडळावर

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या विविध प्राध्यापकांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या विविध विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती तथा निवड करण्यात आलेली आहे. उर्दू विषयाचे चेअरमन म्हणून प्रा.डॉ.मकबूल अहमद तसेच सदस्य म्हणून प्रा.डॉ.हमीद अशरफ, पर्यावरण शास्त्र विषयातून प्रा.डॉ.जे.एम.पटवारी आणि प्रा.डॉ.आर.के.नारखेडे, इंग्रजी विषयातून प्रा.डॉ.के.आर.गव्हाणे, इलेक्ट्रॉनिक्स विषयातून प्रा.डॉ.एम.बी.स्वामी, संगणकशास्त्र विषयातून प्रा.डॉ.एस.व्ही. आवाळे, वाणिज्य विषयातून प्रा.डॉ.बी.एस. होकरणे आणि दुग्धशास्त्र विभागातून प्रा.डॉ.एस.एन.लांडगे आणि कन्नड विषयातून प्रा.डॉ.रमेश हनमंतअप्पा मुलगे यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. प्राध्यापकांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिवअ‍ॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

About The Author