उदगीरात हाजारो कर्मचार्यानी घेतला एकच मिशन…जुनी पेंशन संपात सहभाग!
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील राज्यसरकारी निमसरकारी शिक्षक, ग्रामसेवक,तलाठी,कृषी साहय्यक,आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, लिपिक कर्मचारी,परिचारिका कर्मचारी, तसेच सरकारी,निमसरकारी,शिक्षकेत्तर कर्मचारी,यानी उदगीरात हाजारोच्या संख्येने महिला व पुरुष कर्मचारी विविध संघटनेचे पदाधिकारी यानी संपात सहभागी होवून एकच मिशन,जुनी पेंनशन घोषणा देत उदगीरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासुन ते तहसिल कार्यालय आय टी आय काॅलेज उदगीर पर्यत पायी रॅली काढून एकच मिशन जुनी पेन्शन नारे देत परिसर दणाणून गेला होता . महाराष्ट्र राज्यातील दिनांक 01नोव्हबर 2005रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचार्यांना 1982 पासुनची जुनी पेन्शन योजना लागु करावी. या मागणीसाठी संपुर्ण महाराष्ट्रभर राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक बंधु, भगीनी तसेच तालुक्यातील सर्व NPS कर्मचार्यानी एकजुटीने जुनी पेंन्शन योजना लागु करावी यासाठी हाजारो कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाने याची दखल घेवुन जुनी पेन्शन योजना लागु करावी. अशी विविध संघटेनेच्या माध्यमातुन निवेदन उदगीर तहसिलदार यांना देण्यात आले. यावेळी बि.के.कांबळे ग्रामसेवक संघटना,प्रा.गोविंद भालेराव मराठवाडा शिक्षक संघटना ,संजय वाघमारे शिक्षक भारती संघटना,विनोद गुरमे राष्ट्रवादी शिक्षक संघटना,बिरादार मदन, सुरनर प्रताप,तेलंगे ए.पी., खेळगे एन आर,भोसले रामचंद्र,काळे राजेश,बिरादार बालाजी,म्हेत्रेएच.एस.म,रा.कृषी संघटना,कांबळे बि.के., राठोड एस आर,गुंडरे व्ही.बी. म.रा. परिचारिका संघटना,काबंळे एम ,संध्या पाटिल, मिथुन वाडीकर,तातेराव मुंडे,दापके एम .जी. अनिता येलमटे, आदी सर्व NPSकर्मचारी उपस्थीत होते. हा संप बेमुदत आहे. जोपर्यत जुनी पेन्शन योजना लागु होणार नाही, तोपर्यत संप सुरु आहे. तरी शासनाने लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागु करुन सहकार्य करावे. अशी मागणी जोर धरत आहे.