अहमदपूर हद्दीत अवैध जुगारावर छापेमारी, 11 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 4 लाख 17 हजार 90 रुपयाचा मुद्देमाल जप्त

अहमदपूर हद्दीत अवैध जुगारावर छापेमारी, 11 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 4 लाख 17 हजार 90 रुपयाचा मुद्देमाल जप्त

लातूर (एल.पी.उगीले) : जिल्हा पोलीस अधीक्षक समय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने अवैध धंद्यावर धाडी घातल्या, आणि अवैध धंद्याला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस उपविभाग अहमदपूर अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर व अहमदपूर सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन केले असून त्यांचे मार्फत अहमदपूर उपविभागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दरम्यान दिनांक 14/03/2023 रोजी काही इसम पैशावर तिर्रट जुगार खेळत आहेत अशी संबंधित पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पथकाने अहमदपूर तालुक्यात शेनी शेत शिवारात छापेमारी करून बेकायेशीररित्या जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने एकूण 11 इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 4 लाख 17 हजार 90 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाणे अहमदपूर मध्ये खालील नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चा कलम 12( अ ) कायद्यान्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी नागनाथ रोकडे(, वय 56 वर्ष, राहणार भाग्यनगर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर),शंकर बालाजी भादाळे ,( वय 28 वर्ष, राहणार मावळगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर), माधव दत्तात्र्ये केदार ,(वय 42 वर्ष, राहणार लेक्चर कॉलनी,तालुका अहमदपूर जिल्हा लातूर),
मधुकर हरिबा कांबळे, (वय 52 वर्ष, राहणार सिद्धार्थ नगर, तालुका अहमदपूर जिल्हा लातूर), बबन थोराजी बाजगिर( ,वय 48 वर्ष, राहणार थोडगा अहमदपूर.
आकाश अनिल खेडकर , वय 29 वर्ष, राहणार शिरूर ताजबंद, अहमदपूर),
बालाजी नामदेव कासले ,(वय 36 वर्ष, राहणार नायगाव, अहमदपूर),
देविसिंग मोतीराम चव्हाण ,( वय 59 वर्ष, राहणार साई नगर , अहमदपूर), माधव दत्तात्र्ये गित्ते ,(वय 42 वर्ष, राहणार सेनी, तालुका अहमदपूर.),संग्राम कोंडापुरे (राहणार माळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर.(फरार)) अभिनव मुंढे, (राहणार थोडगा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर.(फरार))अशी असून यामधील संग्राम कोंडापुरे व अभिनव मुंढे हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 14/03/2023 रोजी पोलीस ठाणे अहमदपूर येथील कारवाईत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर व अहमदपूर चे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वातील अहमदपूर उपविभागातील पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदारांनी सदरची कामगिरी केली आहे.

About The Author