निलंगा विधानसभा मतदारसंघात हातचे हात जोडो अभियान उत्साहात सुरू – भोपनीकर

निलंगा विधानसभा मतदारसंघात हातचे हात जोडो अभियान उत्साहात सुरू - भोपनीकर

लातूर (एल.पी.उगीले) : निलंगा विधानसभा मतदारसंघात तांबरवाडी, हालसी, तगरखेडा, शेळगी, ताडमुगळी, औराद येथून “हाथ से हाथ जोडो” अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला.अशी माहिती युवक काँग्रेसचे नेते गजानन भोपणीकर यांनी सांगितली.
भारत जोडो यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर काँग्रेसने ‘हात से हात जोडो’ अभियान सुरू केले आहे. 11 मार्च 2023 पासून निलंगा तालुक्यातील तांबरवाडी, हालसी,तगरखेडा, शेळगी, ताडमुगळी, औराद या गावापासून ‘हात से हात जोडो’ अभियान सुरु करण्यात आले आहे. युवकांचा या अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असून उत्साहाने युवक युवती या अभियानात सहभागी होत आहेत असेही गजानन भोपणीकर यांनी स्पष्ट केले. देशात निर्माण झालेले नकारात्‍मक वातावरण संपविण्यासाठी काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वी झाली आहे. सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या काँग्रेसचा व राहुलजी गांधी यांचा संदेश घेऊन काँग्रेस पदाधिकारी या अभियानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचणार आहेत.
या अभियानास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभयजी साळुंके,जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरजी पाटील,निलंगा तालुका अध्यक्ष विजयकुमारजी पाटील, कार्याध्यक्ष नारायणजी सोमवंशी, डॉक्टर अरविंद जी भातंबरे, रजाक भाई नाईकवाडे माधवराव पाटील,दापका सरपंच लालाभाई पटेल,माजी सभापती अजितजी माने, संजय गांधी निराधार साह्य योजना सदस्य सुरेंद्रजी धुमाळ,शेंदचे सरपंच रमेश मोगरगे,चक्रधरजी शेळके,मदरसे सर, रवींद्र गायकवाड,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,युवक काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष मंगेश चव्हाण किरण मगर,बाळासाहेब देशमुख,बबलू जाधव,अभय शर्मा,पदमसिंगजी पाटील,
युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष श्री मदन बिरादार, काँग्रेस सोशल मीडिया चे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, अमोल नवटके, उधाव बिरादार, किशोर नवटके, शिवाजी घोडके यांच्यासह परिसरातील अनेक गाव, वाडी, तांड्याचे ग्रामस्थ तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author