मुक्कामी बस सुरू ठेवण्याची मागणी
वाढवणा बु.(हुकूमत शेख) : वाढवणा गावात अकरा प्राथमिक शाळा, पाच माध्यमिक शाळा, दोन माध्यमिक व उच्चं माध्यमिक महाविद्यालय व पाठबंधारे कार्यलय, डाक घर, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय रुग्णालय, दोन बँक, 33 केव्ही सबटेशन,सोसायटी असे अनेक महत्वाची कार्यालय आहेत. गावात शेकडो शासकीय, निमशासकीय कर्मचारी असुन दररोज व्यापारी, कर्मचारी, विध्यार्थी, जेष्ठ नागरिक, दिव्यांग, तसेच शून्य तिकिटाचे असंख्य प्रवाशी दररोज महाविद्यालय, न्यायालय, खरेदी,तसेच उदगीर,हाळी हंडरगुळी, शिरूर, अहमदपूर, चाकूर, किनगाव बाजाराला प्रवास करतात, मात्र तालुक्यातील दहा हजार लोकसंख्येचे गाव असूनही गावाला बसच नव्हती, आमचे वार्ताहर हुकूमत शेख यांनी लातुर चे डी. सी. जानराव यांना बस सोडण्यासाठी विनंती केली, डी. सी. जानराव यांनी उदगीर आगार प्रमुख व वाहतूक निरीक्षक पाळणाटे यांना सूचना केल्या, वाढवणा बस (सटल )सोडण्यात आली. मात्र बस मुक्कामी केल्यास वाहक,चालक यांना दररोज ड्युटी मिळेल व गावातील असंख्य प्रवाशांना सवलतीच्या दरात व व्यापारी, विध्यार्थी यांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी उदगीर वाढवणा सटल बस मुकामी ठेवण्याची मागणी ग्रामस्थांथून होत आहे.