विळेगाव सोसायटीवर गुरुदत्त शेतकरी परिवर्तन सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवाराचा दणदणीत विजय

विळेगाव सोसायटीवर गुरुदत्त शेतकरी परिवर्तन सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवाराचा दणदणीत विजय

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील विळेगाव व नेकनाळ या संयुक्त असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत व्यंकटराव जाधव याच्या गुरुदत्त शेतकरी परिवर्तन सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवाराला निवडून देऊन शेतकरी मतदारांनी विरोधकांला मोठा धक्का दिला आहे.हा विजय म्हणजे धनदांडग्या,अरेरावी करणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात असून मतदारांनी कसल्याच अमिषाला बळी न पडता सर्वसामान्य लोकांना निवडून दिले आहे. ही निवडणूक प्रस्थपित धनदांडगे विरोध सर्वसामान्य लोकात झाली आहे. गुरुदत्त शेतकरी परिवर्तन सहकार पॅनलचे विजयी उमेदवार अचवले चंद्रकांत विठ्ठलराव ,जाधव कामालाबाई नरसिंग, जाधव बजरंग शंकर, जाधव व्यंकटराव ग्यानोबा, नाईकवाडे माधव सोपान, नागराळे अशोक विठ्ठल, पांडे रावसाहेब पुंडलिक, पाटील तानाजी लक्ष्मण, महिला राखीव प्रतिनिधी कडमाळे मंगलबाई व्यंकट, जकाकुरे सुकुमारबाई तानाजी, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी सूर्यवंशी ज्ञानोबा दशरथ इतर मागासवर्गीय प्रतिनिधी स्वामी बसवराज रामलिंग तर वि ज भ ज प्रतिनिधी म्हणून कोरे शिवाजी रामा यांच्या सह सर्वच उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. यांच्या विजयासाठी मुरलीधर जाधव ,प्रकाश पाटील नेकनाळकर, किशन बेळकोने, शिवाजी पाटील, मोहन पांडे, अंकुश पाटील, उध्दव ऱ्याडे, बालाजी देशपांडे, नरशिंग नागराळे, हरिश्चंद्र जाधव, रावण अचवले, बळीराम बाचीपाळे, दत्ता बिरादार, नेताजी पाटील, महेश जाधव, काशीनाथ पाटील, भगवान महाराज पांचाळ, बाबूराव पाटील, बसवराज बिरादार इत्यादी लोकांनी प्रयत्न केले. या उमेदवाराच्या विजयात यांचा सर्वाधिक योगदान आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवाराचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!