भाजपा महिला आघाडीच्या वतीने बस प्रवासात 50 टक्के सूट दिल्याबद्दल आनंद उत्सव

भाजपा महिला आघाडीच्या वतीने बस प्रवासात 50 टक्के सूट दिल्याबद्दल आनंद उत्सव

उदगीर (एल. पी. उगिले) : महाराष्ट्र शासनाने महिलांचा सन्मान करण्यासाठी, राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी लोककल्याणकारी विविध योजना सोबतच महिलांसाठी देखील अनेक योजना जाहीर केल्या असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. यामध्ये प्राधान्याने महिलांना बस प्रवासामध्ये दिलेली 50 टक्के सूट ही बाब ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणात महिलांना होणार आहे. त्यामुळे शासनाचे ऋण व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने उदगीर बस स्थानकामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिला पदाधिकारी प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा हिंगोली जिल्ह्याच्या समन्वयक उत्तरा कलबुर्गे, जिल्हा सरचिटणीस शामला कारामुंगे, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा उषा माने, जिल्हा पदाधिकारी मंदाकिनी जीवने, रमाबाई वाघमारे, स्वाती वट्टमवार, अनिता बिरादार, शहर सरचिटणीस वर्षा धावारे, तालुका सरचिटणीस आरती सूर्यवंशी, सुरेखा आंबेगावे, तालुका उपाध्यक्ष रंजीता सांडवे, महादेव पाटील, उषा सूर्यवंशी तसेच याप्रसंगी बस आगारात उपस्थित असलेल्या महिला कंडक्टर, डेपो एटीएस टांगाटूरे आणि महिला प्रवासी यांनी या आनंदोत्सवात सहभाग नोंदवला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या आदेशाने हा कार्यक्रम राबवला जात असल्याचेही बोलले जात होते.

About The Author

error: Content is protected !!