दापका येथे बिदर जिल्हा ओबीसी मोर्चा मोठ्या उत्साहात संपन्न
दापका (प्रतिनिधी) : सीमा भागातील बिदर जिल्ह्यातील कमलनगर तालुक्यामधील दापका सर्कल येथे बिदर जिल्हा ओबीसी मोर्चा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रमुख अतिथी कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा यादगिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, औराद तालुका व कमलनगर तालुक्याचे आमदार प्रभू चव्हाण कर्नाटक राज्यचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष नीला नरेंद्र व ओबीसी राष्ट्रीय कार्यदर्शी लक्ष्मण तपसी व राज्य कार्यदर्शी नेपा तलवाड, ईश्वर सिंग ठाकूर, मराठवाड्याचे भूमिपुत्र, निलंगा तालुक्याचे माजी राज्यमंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सह विविध मान्यवरांनी ओबीसी मोर्चाचे स्टेज गाजवले. बीजेपी सरकारच्या काळामध्ये देशाचा सर्वांगीण विकास वेगाने झालेला आहे. जगाच्या नकाशात पंतप्रधान मोदी यांच्या काळात जो बदल झाला, तो कितीतरी वेगाने झालेला आहे. असे मान्यवरांनी नमूद केले. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय केंद्रात व राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे. ओबीसीचा सर्वसामान्य नेता आज देशाचा पंतप्रधान झालेला आहे. आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी कालच इथल्या कार्यक्रमाला येण्यासाठी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला ठिकाणी दापका या कार्यक्रमाला जाण्यासाठी ध्वनि संपर्क झाल्यानंतर मी तेथील पुजारांना माझा आजचा दोरा हा कर्नाटक मध्ये आहे असं समजल्यानंतर पुजारांनी साहेबासाठी कवड्याची माळ दिलेली आहे ती मी ही माळ मंत्री महोदयांच्या गळ्यात घालत आहे. त्यांच्या जेव्हा पहिल्या निवडणुकीच्या वेळेस लातूर जिल्ह्याचे खासदार रुपाताई निलंगेकर होत्या. तेव्हादेखील कर्नाटकात येऊन प्रचार यंत्रणेला मोलाचे मार्गदर्शन केले होते. असे सांगितले.
