महावितरण कंपनीला झालेय तरी काय? वाढवणा बु येथिल विज सतत होतेय गुल?

महावितरण कंपनीला झालेय तरी काय? वाढवणा बु येथिल विज सतत होतेय गुल?

वाढवणा बु (हुकूमत शेख) : वाढवणा बु हे गाव उदगीर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असुन येथे 33केव्ही सबटेशन देखील आहे. नुकतेच या सब स्टेशनला उदगीरला जोडण्यात आले.तरी देखील सतत विज खंडीत होत असल्यामुळे लहान लहान उद्योग व विजेवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना तासन तास अनेक वेळा विज खंडीत होत असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या बाबी कडे संबंधित अभियंताचे दुर्लक्ष होत आहे, म्हणनूच अभियंत्याच्या आले मना, तेथे कुणाचेही चालेना !! अशी म्हण तंतोतंत येथे लागू होत आहे. हाळी ऐवजी उदगीरहुन विज सोडण्यात येत असल्यामुळे सर्व विज ग्राहक आनंदी झाले होते. आता तालुक्याच्या ठिकाणाहून विज मिळत आहे, चोवीस तास विज राहील अशी आशा सर्व विज ग्राहकांना होती. या मुळे विजग्राहक आनंदित होते, मात्र विज ग्राहकांचा हिरमोड झाला. हाळीच बरे म्हणायची वेळ आली असुन संबंधित अभियंतानी जातीने लक्ष घालुन वाढवणा येथील विज अखंडीत चोवीस तास राहील, अशी व्यवस्था करण्याची मागणी विजग्राहकांकडून होत आहे.

About The Author

error: Content is protected !!