देवणीला पूर्णवेळ स्वतंत्र गटविकास अधिकारी मिळाले

देवणीला पूर्णवेळ स्वतंत्र गटविकास अधिकारी मिळाले

देवणी(प्रतिनिधी) : देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद हे बऱ्याच दिवसापासून रिक्त होते. देवणीचा पदभार उदगीर चे गटविकास अधिकारी महेश सुळे यांच्याकडे होता. सद्यस्थितीत प्रशासक राज असल्यामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या तक्रारी चालू होत्या. रोहयो संदर्भात मातोश्री ग्राम समृद्धी रस्ते, शेतकरी विहिरी, गोठा, इतर शासकीय कामात देवणी तालुक्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे आरोप होत होते. पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना मनमानी करायला संधी मिळते, अशी चर्चा होत होती. आठवड्यातून एक दिवस उदगीरचे गटविकास अधिकारी देऊनी येथे येऊन काम पाहत असल्याने, एका दिवसात सर्व कामे होणे शक्य नसते. त्यामुळे अनेक कामे प्रलंबित होती, त्याचा गैरफायदा इतर कर्मचारी घेत असल्याचेही ओरड देवणी मध्ये होत होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मनमानीच्या काळात झालेल्या कामाची उच्च स्थरिय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत होती. आत्ता नव्याने यापूर्वी कार्यरत असलेले गटविकास अधिकारी सोपानराव अकेले याची देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून दुसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे. या पूर्वीचा कार्यकाळ अतिशय चांगला गेला आहे. तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधीचे सबंध चांगले असल्याने सोपानराव अकेले दुसऱ्यांदा देवणीला आल्याने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About The Author

error: Content is protected !!