उदागीरबाबा संस्थान आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

उदागीरबाबा संस्थान आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : पाडवा सप्ताह निमित्त उदागीरबाबा संस्थान आयोजित रक्तदान शिबिर संपन्न झाले.यावेळी उदगीर परिसरातील भाविक भक्तांनी रक्तदान करत उदागिरबाबा यांना वंदन केले.या वेळी श्रीधर सावळे,उद्धव स्वामी, मनिष बुलानी,किशोर रोडगे,विशाल बिरादार,संगमेश्वर कपाळे,गिरीश झमाने, मल्लिकार्जुन केंद्रे,रुपेश बावगे,तुकाराम जाधव,सुमित बेनकुंदे,अंबादास चौधरी,योगेश कुलकर्णी,संगमेश्वर चंबोले,विष्णू कदम, आदित्य कवटीकवार यांनी रक्तदान केले.

या शिबिराचे आयोजन मठाचे मठाधिश ह. भ.प.जयेशगिर सतिषगिर महाराज यांनी केले होते. शिबिर यशस्वीतेसाठी गजानन मुक्कावर व सर्व भक्तांनी केले. रक्त संकलनाचे कार्य अंबरखाने ब्लड सेंटर उदगीरच्या वतीने पी आर ओ ओमकार गांजुरे,अविनाश बिरादार,सोमनाथ स्वामी, विनायक टकटवळे,बालाजी खडकपुरे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!