लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस स्टेशन अंतर्गत एका पीडित महिलेने आपल्या पतीकडून होणाऱ्या त्रासाच्या विरोधात औसा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गु.र. नंबर. 129/23 कलम भारतीय दंड विधानसभेच्या 498, 504, 506, 34 अन्वये पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सदरील गुन्ह्यांमध्ये तक्रारदार यास अटक न करता, केवळ नोटीस देऊन सोडण्याच्या कामात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार जगन्नाथ लक्ष्मण भंडे, (औसा पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेल्या) हवालदाराने तक्रारदारास तीस हजार रुपये लाच दिल्यानंतर सहकार्य करण्याच्या आश्वासन दिले होते. लाचेची रक्कम तडजोडी अंती  15 हजारावर ठरली. सदरील रक्कम घेऊन तक्रारदार पंचासह गेला असता ती लाचेची रक्कम लोकसेवक भंडे यांनी पंचायत समक्ष स्वीकारली. तेव्हा लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगीहात पकडून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील सापळा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक पंडित रेजीतवाड यांच्यासह लातूर विभागाचे पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर आणि त्यांच्या पथकाने यशस्वी मोहीम राबवली. या प्रकरणाचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली हे करत आहेत.

लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी दलाल, कोणीही शासकीय काम करून देण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त अन्य रकमेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करावा. त्यासाठी संपर्क क्रमांक 930 934 818 4 किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यालयाचा दूरध्वनी संपर्क क्रमांक( 023 82 )24 26 74 यावर संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

error: Content is protected !!